Zodiac Sign : येत्या चार दिवसांनी राशीचक्रातील चार राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरू होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. जेव्हा केव्हा नवग्रहांचे राशी किंवा नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव सुद्धा पाहायला मिळतो.
अशातच आता येत्या चार दिवसांनी शनी आणि मंगळ ग्रहांमुळे एक अशुभ योग तयार होईल अशी माहिती देण्यात आली आहे. खरे तर मंगळ ग्रह येत्या 28 तारखेला कन्या राशि मध्ये गोचर करणार अशी माहिती ज्योतिष तज्ञांनी दिली आहे. मात्र मंगळ ग्रहाचे कन्या राशीतील गोचर काही राशीच्या लोकांसाठी लाभाच ठरणार आहे तर काही राशीच्या लोकांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

खरे तर येथे 28 तारखेला मंगळ ग्रहाचे कन्या राशीत गोचर होणार आहे तर दुसरीकडे शनी ग्रह मीन राशीत विराजमान आहे. दुसरीकडे मंगळ ग्रहाचे गोचर झाल्यानंतर शनी आणि मंगळ एकमेकांपासून सातव्या स्थानी राहणार आहेत आणि यामुळे समसप्तक योगाची निर्मिती होईल आणि हाच योग राशीचक्रातील चार महत्त्वाच्या राशीच्या लोकांसाठी आव्हानाचा ठरणार अशी माहिती ज्योतिष तज्ञांनी दिलेली आहे.
या राशीच्या लोकांचा आव्हानाचा काळ सुरू होणार
मीन : मंगळ आणि शनी ग्रहाच्या प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांचा संकटाचा काळ सुरू होणार आहे. या काळात या लोकांनी विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे कारण की समसप्तक या योगामुळे एखादी महत्त्वाची व्यक्ती या राशीच्या लोकांवर नाराज होऊ शकते आणि यामुळे या लोकांचे काम बिघडण्याची दाट शक्यता आहे.
या काळात या लोकांच्या बाबतीत गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे या काळात या लोकांनी आपल्या वाणीवर विशेष नियंत्रण मिळवायला हवे. शक्य तेवढे गोड बोलून आपली कामे पूर्ण करणे हेच या लोकांसाठी अधिक फायद्याचे ठरणार आहे. या काळात कोणत्याही वादविवादापासून लांब राहिल्यास या लोकांना फायदा होईल.
वाद-विवाद आणि भांडण कशी टाळता येतील याकडे या लोकांनी विशेष लक्ष द्यावे. या काळात या लोकांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे. एकंदरीत 28 जुलै नंतरचा काळ या राशीच्या लोकांसाठी आव्हानाचा राहणार आहे.
धनु : मीन राशीच्या लोकांप्रमाणेच धनु राशीच्या लोकांसाठी देखील आगामी काळ मोठा आव्हानात्मक राहील. हे लोक या काळात मोठ्या प्रमाणात अस्वस्थ राहतील आणि असंतुष्ट देखील राहतील. या काळात या राशीच्या लोकांना अधिक मेहनत करावी लागणार आहे.
या काळात या लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात आणि यामुळे हे लोक तणावात राहतील अशी माहिती दिली जात आहे. या काळात या लोकांपुढे नवीन अडचणी उभ्या राहतील. या काळात या लोकांच्या विरोधात कटकारस्थान सुद्धा रचला जाऊ शकतो. यामुळे या लोकांनी अधिक सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
कन्या : मीन आणि धनु राशीच्या लोकांप्रमाणेच कन्या राशीच्या लोकांसाठी देखील 28 जुलै नंतरचा काळ आव्हानाचा राहणार आहे. करिअरसाठी हा काळ मोठ्या प्रमाणात संकटाचा राहील. करिअर सोबतच या काळात वैयक्तिक आयुष्यात देखील या लोकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
हे लोक या काळात योग्य निर्णय घेण्यास असमर्थ ठरतील. आणि निर्णय चुकला की साहजिकच या लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. या काळात आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढतील. जवळच्या नात्यांमध्ये गैरसमज वाढण्याची सुद्धा दाट शक्यता आहे.
सिंह : कन्या मीन आणि धनु राशीच्या लोकांप्रमाणेच सिंह राशीच्या लोकांचा ही संकटाचा काळ लवकरच सुरू होणार आहे. या काळात या लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या काळात या लोकांचे पैसे बुडण्याची शक्यता अधिक आहे म्हणूनच गुंतवणूक करणे टाळणे आवश्यक आहे.
या लोकांना या काळात सातत्याने अपयशाचा सामना करावा लागू शकतो. या काळात नातेसंबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे सोबतच बोलण्यातील कठोरपणा देखील तीव्र होणार असे बोलले जात आहे. खऱ्या अर्थाने या राशीच्या लोकांचा वाईट काळ सुरू होणार आहे.