Ahilyanagar News: शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी ! ४० टन कांदा वाहून गेला पाण्यात, टरबूजाचे दर कोसळले…

Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर शिवारात यावर्षी वारंवार झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पाऊस व त्यासोबत येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी अनेकांचे पिके उध्वस्त केली. नुकताच एक शेतकरी नानासाहेब रामदास जगदाळे यांचे चार एकर क्षेत्रातील कांद्याचे उत्पादन पूर्णतः भिजले. अंदाजे ४० टन कांद्याचे नुकसान झाल्याने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. जगदाळे यांनी उशिरा काढणीला … Read more

Onion Price Crash : कांद्याने डोळ्यात पाणी आणलं ! भाव नसल्याने कांदा झाला शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझं

Onion Price Crash : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात कांदा हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कांद्याच्या एका किलोसाठी सुमारे पाच रुपये उत्पादन खर्च येतो, परंतु सध्याच्या बाजारभावात हा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जिरायत भागातील हे एकमेव नगदी पीक … Read more