18GB RAM, वॉटरप्रूफ डिझाइन आणि दमदार फीचर्स; Realme चा नवाकोरा फोन फक्त ₹15,999 मध्ये खरेदी करण्याची संधी!

Published on -

Realme P3 5G : Realme ने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनी 22 एप्रिलपासून ‘समर कार्निव्हल सेल’ आयोजित करत आहे, ज्यामध्ये Realme P3 Series मधील स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणावर सूट मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना Realme P3 5G आणि Realme P3 Pro 5G हे दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन आकर्षक किंमतीत खरेदी करता येणार आहेत. हा सेल 24 एप्रिल 2025 पर्यंत चालणार असून Flipkart आणि Realme.com वर उपलब्ध राहील.

Realme P3 5G हा स्मार्टफोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज. या दोन्ही व्हेरिएंटवर सवलत दिली जात आहे. 6GB व्हेरिएंट 1,000 रुपयांच्या बँक डिस्काउंटसह 15,999 रुपयांना विकला जात आहे, तर 8GB व्हेरिएंट 2,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर त्याच किंमतीत मिळू शकतो. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर आणि IP69 वॉटरप्रूफ रेटिंगसारखी खास वैशिष्ट्ये आहेत.

Realme P3 Pro 5G

Realme P3 Pro 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर आणि ग्लो-इन-द-डार्क डिझाइन आहे. या फोनवर 4,000 रुपयांची बँक सूट आणि 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. सूटनंतर याची किंमत 19,999 रुपये होते. यामध्ये 6000mAh बॅटरी, 80W SuperVOOC चार्जिंग, OIS सह 50MP AI कॅमेरा, AI नाईट मोड आणि स्मार्ट पोर्ट्रेट मोड दिला आहे. याला IP66/IP68/IP69 सर्टिफिकेशन मिळाले असून हा फोन विविध हवामान परिस्थितींसाठी सुसज्ज आहे.

Realme P3 5G चे फिचर्स

Realme P3 5G मध्ये 6.67-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे. यात Snapdragon 6 Gen 4 चिपसेट देण्यात आले असून गेमिंगसाठी AI मोशन कंट्रोल आणि AI अल्ट्रा टच कंट्रोलसारखी फिचर्स आहेत. यामध्ये 50MP AI रियर कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा दिला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून IP69 वॉटरप्रूफ डिझाइनने हा फोन पाण्यापासून सुरक्षित राहतो.

Realme P3 Series च्या या ऑफर्समुळे परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक फीचर्स असलेले फोन मिळणार आहेत. स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल एक उत्तम संधी ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News