आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वॉशिंग मशीन हा प्रत्येक घरातील महत्त्वाचा घटक बनला आहे. हे मशीन रोजच्या कपडे धुण्याच्या कामाला सोपे आणि वेगवान बनवते. मात्र, मशीनचा अतिवापर केल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे दररोज किती वेळ वॉशिंग मशीन वापरणे योग्य आहे आणि त्याचा अतिरेक केल्याने काय नुकसान होऊ शकते? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
वॉशिंग मशीन किती वेळ वापरावे? – तज्ज्ञांचे मत
कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल कंपनी Croma च्या रिपोर्टनुसार, वॉशिंग मशीनचा दिवसाला १ तास वापर करणे योग्य आहे. यामुळे मशीनच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. मात्र, एकाच वेळी जास्त कपडे धुण्यामुळे आणि मशीन सतत चालू ठेवल्यास त्याच्या भागांवर दडपण येते आणि त्याचा कालांतराने खराब होण्याचा धोका वाढतो.

जर दररोज वॉशिंग मशीन वापरत असाल तर…
मशीनचा वापर दिवसाला १ तासापेक्षा अधिक करू नका.ओव्हरलोडिंग करू नका. कपड्यांचे प्रमाण ठरावीक मर्यादेत ठेवा.जर दिवसातून दोन वेळा मशीन चालवायचे असेल, तर दोन सत्रांमध्ये विश्रांती द्या. हाय-एंड मशीनची निवड करा, कारण मध्यम किंमतीच्या मशीनसाठी दीर्घकालीन सतत वापर योग्य नाही.
वॉशिंग मशीनचा अति वापर केल्याने होणारे नुकसान
१. मोटर ओव्हरहिट आणि बर्न होण्याची शक्यता : वॉशिंग मशीनमध्ये असलेल्या मोटरला सतत काम करण्यासाठी थोडा विश्रांती काळ आवश्यक असतो. जर मशीन सतत २-३ तास वापरण्यात आले, तर मोटर गरम होऊन बर्न होण्याचा धोका वाढतो.
२. ड्रम खराब होण्याचा धोका : ड्रम सतत फिरत राहिल्यास त्याच्या बियरिंग्ज लवकर खराब होतात आणि मशीनमध्ये आवाज यायला लागतो. हे मशीनच्या दीर्घकालीन टिकावासाठी हानिकारक आहे.
३. इलेक्ट्रिक पार्ट्सवर परिणाम : जास्त वेळ वॉशिंग मशीन चालवल्यास त्यामधील इलेक्ट्रॉनिक भाग जास्त तापतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी, मशीन मध्ये अचानक खराबी येण्याची शक्यता वाढते.
४. पाणी आणि वीजेचा अनावश्यक वापर : वॉशिंग मशीनचा जास्त वेळ वापर केल्यास वीज आणि पाण्याच्या बिलात वाढ होते. यामुळे घरगुती खर्च वाढू शकतो.
मशीनचे दीर्घायुष्य वाढवण्यासाठी महत्त्वाचे नियम
१. ओव्हरलोडिंग टाळा : वॉशिंग मशीनमध्ये ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त कपडे टाकल्यास मशीनवर दडपण येते. त्यामुळे कपड्यांची योग्य विभागणी करून त्यांचा धुण्यासाठी वेगळ्या वेळा ठरवा.
२. दररोज १ तासाच्या मर्यादेपर्यंतच वापरा : मशीनला आराम देणे गरजेचे आहे. त्यामुळे एकाचवेळी १ ते दीड तासापेक्षा अधिक वेळ चालू ठेवू नका.
३.स्वच्छता राखा : मशीनच्या अंतर्गत भागांची स्वच्छता नियमितपणे करा. तसेच, योग्य प्रमाणात डिटर्जंट वापरणे गरजेचे आहे. जास्त डिटर्जंट वापरल्यास मशीनमध्ये फोम तयार होऊन ते अडथळा निर्माण करू शकते.
४. सर्व्हिसिंग करा : मशीनच्या उत्तम देखभालीसाठी कमीत कमी दर ६ महिन्यांनी एकदा प्रोफेशनल सर्व्हिसिंग करून घ्या. यामुळे मशीनचे कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहते.
वॉशिंग मशीनचे अतिवापर केल्याने त्याची आयुष्य कमी होते आणि दुरुस्तीचा खर्च वाढतो. त्यामुळे वॉशिंग मशीनचा दिवसाला १ तासापेक्षा अधिक वापर करणे टाळा आणि ओव्हरलोडिंग करू नका.
योग्य पद्धतीने मशीनचा वापर केल्यास मशीन जास्त काळ टिकेल आणि कोणत्याही अडचणीशिवाय उत्तम कार्यक्षमता देईल. त्यामुळे योग्य वापर करून वॉशिंग मशीनची दीर्घायुष्यता वाढवा आणि खर्च कमी करा.