पंजाब डख : पावसाचा जोर ओसरणार, पण 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असे म्हटले आहे. या काळात राज्यात कडक ऊन पडणार आहे पण दुपारनंतर काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Tejas B Shelar
Updated:
Panjab Dakh News

Panjab Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपल्या मागील अंदाजात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, आता पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज दिलाय.

या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कमी राहणार असे म्हटले आहे. या काळात राज्यात कडक ऊन पडणार आहे पण दुपारनंतर काही ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पावसाचा जोर कमी राहील

राज्यात 30 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. पण, ही परिस्थिती थोड्याच दिवसांसाठी राहणार आहे.

कारण की सप्टेंबर च्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे. पंजाब रावांच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी विशेषता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत.

एक सप्टेंबर पासून महाराष्ट्रात… 

कारण की 31 ऑगस्ट नंतर राज्यातील हवामान बदलणार आहे. एक सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.

एक सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत तसेच काही ठिकाणी सहा सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसाची शक्यता

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, जळगाव जामोद, लातूर, उस्मानाबाद, कन्नड, वैजापूर, धुळे, संभाजीनगर, नाशिक, सटाणा, मालेगाव या भागात या कालावधीत चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे. येथे पाऊस पूर्णपणे उघडीप देणार नाही मात्र पावसाचा जोर कमी होईल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथेही सुरूच राहणार आहे.

मराठवाड्यात चांगला पाऊस होणार

मुंबई आणि कोकणाबाबत बोलायचं झालं तर इकडे कंटिन्यू पाऊस सुरू राहणार आहे. राज्यातील ही एकंदरीत परिस्थिती पाहता मराठवाड्यातील जायकवाडी धरण 5 सप्टेंबर पर्यंत 78% पर्यंत भरणार असा विश्वास पंजाब रावांनी व्यक्त केला आहे.

सध्या जायकवाडी धरण 56 टक्क्यांवर पोहोचले आहे. मात्र पुढल्या महिन्याच्या सुरुवातीलाच धरणात पाण्याची आवक वाढणार आहे आणि यामुळे जायकवाडी धरण 78% पर्यंत भरणार आहे. राज्यात बैलपोळ्याच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe