पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज; राज्यात ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार जोरदार पाऊस, पण…..

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. आज दोन ऑगस्ट रोजी पंजाबरावांनी एक नवीन अंदाज जारी केला असून यामध्ये दोन ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

म्हणजेच राज्यात आजपासून सहा दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज रावांनी जारी केला आहे.

पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. मात्र यानंतर मोसमी पाऊस विश्रांती घेणार आहे. नऊ आणि दहा तारखे नंतर राज्यात कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार असा अंदाज आहे.

8 ऑगस्टपर्यंत राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस पडणार ?

डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आज अर्थातच दोन ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ विभागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा विभागात दररोज दुपारी तीन-चार वाजेनंतर पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आणि दररोज या विभागात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात देखील या कालावधीमध्ये समाधानकारक असा पाऊस पडणार आहे. या विभागातही सरीवर सरी असा पाऊस सुरूच राहणार आहे. आठ ऑगस्टपर्यंत कोकणातही चांगला पाऊस पडणार आहे. कोकणात पावसाची तीव्रता इतर भागांपेक्षा अधिक राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात देखील दोन ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, इगतपुरी, नाशिक, मालेगाव या भागात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe