सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळून दिवस चांगला जातो. नियमित चालणं, तसंच योगासनं हे व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं.
दिवसभराच्या कामांचं सकाळीच नियोजन करून ती कामं शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कामाचा अतिरिक्त तणाव येत नाही.

- पौष्टिक आणि संतुलित आहाराचं पालन करावं.
- दररोजच्या आहारात फळं, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
- दोन वेळच्या जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवावा.
- रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावं.
- दररोज किमान १० ते १२ ग्लास पाणी प्यावं.
- जास्त क्षार आणि शर्करायुक्त पदार्थ खाणं टाळावं.
- धूम्रपान, दारू, चटपटीत पदार्थ आणि फास्टफूड यांच्यापासून दूर राहावं.
- पचनक्रियेच्या आरोग्यासाठी आठवडय़ातून एकदा उपवास करावा.
- रोजच्या कामाच्या वेळापत्रकात शारीरिक श्रमाला महत्त्व द्यावं. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, अॅसिडिटी, निद्रानाश, कॅन्सर आणि हृदयरोग या आजारांपासून दूर राहता येतं.
- कामाच्या व्यापातून आपल्या परिवारासाठी वेळ काढा. त्यामुळे कामाचा तणाव दूर होतो.
- कामाइतकीच शरीराला आरामाचीही गरज असते. रात्रीची आठ ते दहा तासांची शांत झोप शरीरासाठी आवश्यक असते.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात