संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले.
पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली.
यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार ते चार दरम्यान ही घटना घडली.
विशाल दत्तात्रय तांदळे (२२, मंचर, जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (२०, निंबाळे चौफुली, संगमनेर) हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून क्रमांक दोनच्या कोठडीत होते.
त्यांच्यासमवेत न्यायालयीन कोठडीतील आणखी अकरा आरोपी होते. कोठडीचे गज कापल्यानंतर या दोघांनीच पलायन केले. अन्य आरोपी तेथेच होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी आरडाओरडा करत आरोपींमागे पळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तातडीने बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली.
गस्तीवरील पोलिस पथकाने आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोध सुरू केला. आरोपी त्यांना संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळ असलेल्या काटवनात आढळले. आरोपींना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! E-Kyc साठी आता ‘ही’ अट पण झाली शिथिल
- गॅस ग्राहकांसाठी आनंदाची ! महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरचे रेट झालेत कमी
- महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्त्वाचे आदेश! आता….
- पश्चिम रेल्वेचा महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! राज्यातील ‘या’ 9 स्थानकातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?
- आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा पगार खरंच दुप्पट होणार का ? ‘ही’ सिक्रेट गोष्ट कोणीचं सांगणार नाही तुम्हाला













