अहमदनगर : बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी सेवा संस्था, अहमदनगर यांच्यातर्फे आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पूरसाकाराचे मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे व जंगले महाराज यांच्या हस्ते नुकतेच दि. १७/०९/२०१९ रोजी सावेडीतील माउली संकुलामध्ये वितरण करण्यात आले.
यावेळी आदर्श अभियंता म्हणून श्री. अंकुश अशोकराव पालवे व श्री श्रीनिवास वर्पे यांचेसह श्री अनिल लाटणे, श्री. पी. जे. जाधव यांना सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर आदर्श कर्मचारी म्हणून श्री. हेमंत शेवाळे, श्री. सुनील भाऊसाहेब खेमणार, श्री. दीपक वाघ,, श्री. विठ्ठल होळकर, श्री. भैरव धाडगे यांना तर श्रीमंती मीराबाई कर्डीले व श्री. अरविंद सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लोकसेवेप्रती भरीव व अमूल्य योगदानामुळे त्यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. एन. डी. कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून भगवंताचे स्मरण व स्मरण ऊर्जा याबद्दलचे महत्त्व सांगितले व त्यांनी यापुढेही समाजाची अशीच अखंड व चांगली सेवा करत राहो याकरिता आशीर्वाद दिले.
जंगले महाराजांनी हा प्रामाणिकपणाबद्दलचा गौरव असल्याचे सांगितले. एल अँड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना या सर्वांचे समाजाबद्दलचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. सर्व सत्कारमूर्तींनी संस्थेचे व समाजाचे आभार मानले.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ