कोरोनाला रोखण्यासाठी देशात सेक्सवर बंदी ? जाणून घ्या सत्य

कोरोना व्हायरस जगात पसरला तसा वेगवेगळ्या पृष्ठभागांना हात लागला तर काय होईल, ही भीतीही लोकांच्या मनात घर करतेय.

लिफ्टचं बटण कोपराने दाबणे, दाराची मूठ उडताना हातावर रुमाल ठेवणे किंवा दाराची मूठ वारंवार पुसून घेणे,

रेल्वेतून हँडल न धरता प्रवास करणे, ऑफिसमध्ये काम करतो तो टेबल वारंवार पुसणे, अशी दृश्यं नेहमीचीच झाली आहेत.

कोरोना विषाणुचा सर्वाधिक फैलाव झालेल्या भागांमध्ये स्थानिक प्रशासनाकडून पार्क, रस्ते

अशा सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठीची औषध फवारणी केली जात आहे.

दरम्यानकोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

असे असताना काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.

यामध्ये बेल्जियममध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सेक्स करण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा केला आहे.

मात्र या सगळ्या अफवा असल्याचे समोर आले आहे.

Worldnewsdailyreport.com या वेबसाईटने बेल्जियमच्या आरोग्यमंत्री मॅगी दे ब्लॉक यांनी घरात कोणतीही लैगिंक संबध ठेवू नये,

असे आदेश दिले असल्याचे नमुद करण्यात आले होते.

यात, बेल्जियम हा युरोपातील सेक्स कॅपिटल म्हणून ओळखला जातो,

त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले होते.

मात्र ही संपूर्ण बातमीच नव्हे तर ही वेबसाईटच फेक असल्याचे समोर आले आहे,

तसेच ही वेबसाईट केवळ मनोरंजनाच्या कारणास्तव चालू असून

सर्व बातम्या फेक असतात.या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असेही लिहिण्यात आले आहे.