‘त्या’ बंगाली मुलीमुळे अभिनेता सुशांतसिंग होता त्रस्त ? न्यायालयीन चौकशीची कुटुंबीयांची मागणी

अहमदनगर Live24 टिम : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पसरली आहे.

सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुशांतच्या मामांनी या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता.

काही दिवसांनी वडिलांची भेट होणार होती पण दुर्दैवाने त्या आधीच त्याने आत्महत्या केली.

याच दरम्यान मुंबई पोलिसांनी या प्रकरणी सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नसल्याचं सांगत चौकशी अद्याप सुरु आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई पोलिसांचे प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांनी सुशांतच्या आत्महत्येची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, अभिनेत्याच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या नोकराने पोलिसांना बोलावून त्यांच्या आत्महत्येची माहिती दिली.