20 फेब्रुवारीला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- 20 फेब्रुवारी ला गोदावरीच्या कालव्यांना पाणी सुटणार आहे. सुरुवातीला पिण्यासाठी पाणी तलावात सोडले जाणार आहे. त्यानंतर सिंचनाचे आवर्तन सुरु होईल.

शिर्डी मतदार संघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे आवर्तन वेळेत सोडावे यासाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार राहाता व कोपरगाव तालुक्यातील शेतीसाठी गोदावरी कालव्यांना उन्हाळी पहिले सिंचनाचे आवर्तन येत्या 20 फेब्रुवारी रोजी सुटणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्याला पाणी सुटणार आहे.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील कांदा, गहू, यांना तसेच फळबागा तसेच अन्य पिकांना या आवर्तनातील पाणी देण्यात येणार आहे. रब्बी हंगामाची 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत असते. परंतु हे आवर्तन 20 अथवा 21 फेब्रुवारी रोजी सुटणार आहे.

त्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगाम यांच्या जॉईन्टवर हे आवर्तन सुटणार आहे. 20 फेब्रुवारी ते 15 मार्च असा या आवर्तनाचा कालावधी असणार आहे. या आवर्तनासाठी 3.5 टिएमसी पाण्याचा वापर होणार आहे.

उन्हाळी दुसरे आवर्तन मे महिन्यात घेण्याच्या दृष्टीनेही तयारी जलसंपदा विभागाने केली आहे. सुरुवातीचे रब्बीचे आवर्तन 1 जानेवारी ते 15 जानेवारी असे अवघ्या 15 दिवसांचे घेण्यात आले. त्या आवर्तनात सिंचनासाठी काही शेतकर्‍यांनी पाणी घेतले, तर काहिंनी घेतले नाही. त्यामुळे ते आवर्तन थोडक्यात उरकले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe