मुंबई :- तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १० वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पद – ग्रामीण डाक सेवक
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९
वयोमर्यादा
- अर्जदार उमेदवाराचं वय कमीत कमी १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं
- एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल
शैक्षणिक पात्रता
- इच्छुक आणि पात्र उमेदवार हा १० वी पास असावा
- कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक
पगार
१०,००० ते १४,५०० रुपये
असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जापूर्वी उमेदवाराला नाव नोंदणी करावं लागणार आहे. अर्ज नोंदणीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ पासून ते ३० नोव्हेबंर २०१९ पर्यंत असणार आहे.
- अहिल्यानगरमध्ये ८,४८१ मृत खातेदार, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू
- गाव पुढाऱ्यांनो लागा कामाला : जिल्ह्यातील १ हजार २२३ सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर ; ६२५ महिला पाहणार गावचा कारभार!
- उन्हाळ्यात फिरायला जाण्यासारखी महाराष्ट्रातील टॉप १० पर्यटन स्थळे
- लाडकी बहिण योजना : योजना बंद होणार की रक्कम कमी होणार? जाणून घ्या सरकारचे स्पष्ट उत्तर
- Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि कुटुंबासह शनी चरणी