केंद्रीय पथकाचा ठपका, आरटी-पीसीआरची कमतरता, उपाययोजनांच्या अभावामुळे वाढतोय कोरोना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- या तीन राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची कमतरता, कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव व आरोग्यकर्मींचा तुटवडा ही रुग्णवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे केंद्रीय पथकांचे म्हणणे आहे.

रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र, छत्तीसगड व पंजाब आघाडीवर आहेत. या तीन राज्यांतील ५० जिल्ह्यांमध्ये करोना विषाणू संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय पथके नेमण्यात आली होती. या पथकांनी आता येथील वाढत्या रुग्णसंख्येमागील कारणे सांगितली आहेत.

महाराष्ट्रातील सातारा, सांगली व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये परिमिती नियंत्रण आणि सक्रिय देखरेखीचा अभाव असल्याचे केंद्रीय पथकांनी जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे.

याखेरीज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोिवड चाचणी यंत्रणांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्याने चाचण्यांचा निकाल येण्यासाठी विलंब होत आहे. कोरोना संबंधीच्या सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्यात येत नसल्याचे केंद्रीय पथकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी ४८.५७ टक्के बाधित असलेल्या महाराष्ट्रात केंद्रीय पथकांनी ३० जिल्ह्यांना भेटी दिल्या. यानंतर ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये दिवसाला आढळणाऱ्या बाधितांचा आकडा रोज एक नवा विक्रम करत आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र, छत्तीसगड व पंजाब आघाडीवर आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe