अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीने पुणेकरांची चिंता वाढवली होती. मात्र बुधवारी सुखद वार्ता मिळाली.
बुधवारी तब्बल ४ हजार ८९५ रुग्ण कोरोनाला हरवून घरी परतले. दरम्यान, पुण्यात बुधवारी दिवसभरात ४ हजार २०६ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली.
पुण्यात सध्या १ हजार १५८ कोरोनाबाधित हे क्रिटिकल रुग्ण आहेत. आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ३ लाख ४४०२९ आहे. तर एकूण अॅक्टीव्ह रुग्ण हे ५३ हजार ३२६ आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनाच्या साथीत ५ हजार ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत २ लाख ८४ हजार ८०१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज एकूण २१ हजार ३२५ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले.
पुण्यात बुधवारी ४ हजार २०६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. एका दिवसात ४ हजार ८९५ जण कोरोना मुक्त झाले.
ही संख्या एकट्या पुणे शहरातील आहे. पुण्यात आज ६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ६६ पैकी २० रुग्ण हे पुण्याच्या बाहेरील नागरिक आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|