अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते चक्रीवादळाचा राज्यातील अनेकभागात फटका बसला आहे. या वादळाचा नगर तालुक्यातील बहुतांशी भागाला देखील तडाखा बसला आहे.
यात प्रामुख्याने कांदा व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासुन अनेक भागातील वीज गायब झाली आहे.
कोरोनामुळे आधीच बेजार झालेला बळीराजा चक्रीवादळाच्या तडाख्याने पुरता हैराण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असून
त्यामुळे नगर तालुक्यात सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा शेतातच होता.
चक्रीवादळाने पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. वेगवान वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा भिजला तसेच आंबा ,
लिंबू , चिकू यासारख्या फळझाडांचे मोठ्या प्रमाणात फळे वादळाने खाली गळून पडले. वादळाने तालुक्यात दोन दिवसांपासुन वीज गायब असल्याने विजेअभावी लोकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम