जेऊर येथील ग्रामदैवत देवीचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर गावचे आराध्य दैवत देवी बायजामाता यात्रोत्सव वैशाख बुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

चालू वर्षी बुधवारी (दि.२६) होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. बायजामाता देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

यात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भक्त दर्शनासाठी येत असतात. यात्रोत्सव काळात येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

बायजामाता यात्रोत्सव रद्द करण्याचे हे दुसरे वर्ष आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.