सावधान ! राज्यात 9 ते 12 जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये दाखल झालेला मान्सून लवकरच विदर्भातही प्रवेश करणार आहे. 12 ते 14 जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

या काळात मान्सून गडचिरोली, गोंदिया हा सारा परिसर व्यापेल, असा अंदाज आहे. राज्यात एनडीआरएफआणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यातबाबत ही सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे सोबत बैठक घेतली होती.

दरम्यान येत्या काही तासात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, रायगड, हिंगोली, पालघर तसेच परभणी या ठिकाणी ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe