अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- पिकात जनावरे चारण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारीची घटना तालुक्यातील खडांबे खुर्द येथे घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंंबातील लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला व कुटुंबातील सदस्य शेतात काम करत असताना अमोल साळवे हा जनावरे चारण्यासाठी घटनास्थळी आला होता. संबंधित महिलेने पिकात जनावरे चारू नकोस असे म्हटल्याचा राग आल्याने साळवेने महिलेस शिवीगाळ करून घरातील चार लोकांना घटनास्थळी बोलावून घेतले.
महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनाही मारहाण केली.
दुसऱ्या गटातील महिलेच्या फिर्यादी वरून अर्जुन लटके व इतर सहा लोकांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या फिर्याद दिल्याने लटके कुटूंबातील सहा लोकांवर गुन्हा नोंदवला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम