भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरु…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मान्सूनने हजेरी लावली.

यामुळे भंडारदरा पाणलोटातील धबधबे आणि ओढेनाले खळखळू लागले आहेत. या धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली आहे.

11039 दलघफू क्षमता असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.

नुकतेच झालेल्या पावसाने भंडारदरा धरणात नव्याने 21 दलघफू पाण्याची आवक झाली. तर 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या धरणात काल सायंकाळी 5401 दलघफू पाणीसाठा होता. 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुळा पाणलोटातही पावसास सुरूवात झाली आहे.

कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड व आंबितमध्ये पावसामुळे ओढेनाले सक्रिय झाले आहेत. पाऊस होत असल्याने करोनातून मुक्त झालेला शेतकरी आता मशागतीच्या कामांत गुंतला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe