संभाजीराजेंना पाठिंबा देत आमदार पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक टीका !

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. यातच मराठा आरक्षणाचा प्रमुख चेहरा बनलेले छत्रपती संभाजीराजे हे राज्याच्या विविध भागात दौरा करत आहे.

यातच संभाजीराजे यांच्या यांच्या भूमिकेला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला. मात्र यावेळी त्यांनी ‘सवंग प्रसिद्धीसाठी काही पण बोलू नका’ नका असा शाब्दिक टोला चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे कर्जत येथे आले होते.

यावेळी त्यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे आणि तो योग्य आहे. या प्रश्नावर सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणीही राजकारण करू नये. युवकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.

कोणीतरी एक व्यक्ती पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. मात्र कोणीतरी सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा पेपरमध्ये बातम्या याव्यात यासाठी हव्यास म्हणून जर काही वक्तव्य करत असेल किंवा यामध्ये राजकारण करू पाहत असेल तर हे योग्य नाही.

असे बोलतच आमदार पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे नाव ने घेता त्यांना चांगलाच शाब्दिक टोला लगवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News