अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी शोरुम समोरुन सोमवारी (दि.14 जून) शिक्षकाची बजाज पल्सर दुचाकी चोरीला गेली.
साजिद लालासाहेब पठाण (रा. उक्कडगाव, ता. नगर) हे शिक्षक असून, कामानिमित्त ते इलाक्षी शोरुम मध्ये आले होते.
ते परत घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची बजाज कंपनीची पल्सर 150 एमएच16 सीएन 9689 नंबरची काळ्या रंगाचे वाहन चोरीला गेल्याचे लक्षात आले.
अज्ञात चोरट्याने सदरचे वाहन चोरले असून, सदर वाहन आढळल्यास 7020898626 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन साजिद पठाण यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम