अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूने कहर केला आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट हि अत्यंत घटक ठरली. यामध्ये अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली.
अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नागरिक अद्यापही जबाबदारीने वागण्यास तयार नाही आहे. यामुळे पोलीस प्रशासन पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले आहे.

करोना रूग्णसंख्या कमी होत असली तरी संभाव्य तिसर्या लाटेचा धोका आहे. बाजारपेठ सुरू झाली आहे.
यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. यामुळे शहर पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त पथकाकडून नगर शहरात दोन दिवसांपासून फिरणार्यांची रस्त्यावरच अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे.
करोना रूग्णसंख्या कमी झाल्याने अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. करोना संख्या कमी झाली असली तरी धोका टळलेला नाही.
यामुळे खबरदारी घेणे हाच पर्याय आहे. बाहेर पडताना तोंडावर मास्क असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांच्या चेहर्यावर मास्क दिसून येत नाही. अशा लोकांपासून करोना संसर्ग होण्याची भिती जास्त असते.
यामुळे विनामास्क फिरणार्यांवर शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रविवार, सोमवार दोन दिवस शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून शहर पोलिसांनी विनामास्क फिरणार्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली.
शहर पोलिसांबरोबर मनपाच्या दक्षता पथकाकडून कारवाई केली जात आहे. अँटीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आल्यास त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













