अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट बरीच ओसरली आहे. परंतु वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्डचा वापर होत आहे. मात्र ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्डची लस घेतलेल्या ११ जणांना दुर्मिळ आजार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
लस घेतलेल्या ११ जणांना गिलन बार सिंड्रोम हा मेंदूशी संबंधित आजार झाला आहे. भारत आणि ब्रिटनमधील तज्ज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनांतून ही बाब समोर आली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. केरळमध्ये कोविशील्डची लस घेतल्यानंतर सात जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला. या व्यक्तींनी एकाच लसीकरण केंद्रातून लस घेतली होती.
या लसीकरण केंद्रात आतापर्यंत जवळपास १२ लाख जणांचं लसीकरण झालं आहे. तर ब्रिटनमधील नॉटिंगहॅममध्ये चार जणांना गिलन बार सिंड्रोम आजार झाला आहे. या भागात एकूण ७ लाख लोकांना ऍस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली आहे.
सीरमनं तयार केलेली लस ब्रिटनमध्ये ऍस्ट्राझेनेका, तर भारतात कोविशील्ड नावानं ओळखली जाते. गिलन बार सिंड्रोम आजार झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चुकून मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करू लागते.
याबद्दल केरळ आणि नॉटिंगहॅममधील तज्ज्ञांनी अभ्यास केला. याबद्दलचा अहवाल एका नियतकालिकात १० जूनला प्रसिद्ध झाला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम