दररोज डाळिंब खाणे आहे चांगले… जाणून घ्या ५ महत्वाचे फायदे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  डाळिंब या फळात ओमेगा फाइव्ह कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटीऑक्सिडंट, प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, रायबोफ्लेवीन, लोह, फॉलिक अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, थायमिन हे पोषक घटक आहेत.

याच कारणामुळे दररोज डाळिंब चावून खाणे लाभदायी आहे. डाळिबांच्या नियमित सेवनाने शरीराला लाभदायी असे पोषक घटक मिळतात. निरोगी राहते. डाळिंब खाण्याचे फायदे 1) अशक्तपणा दूर होतो

– दररोज किमान एक डाळिंब खाल्ल्याने

  • 1)अशक्तपणा दूर होतो. रुग्णांनी नियमित डाळिंब खाल्ल्यास त्यांची तब्येत लवकर सुधारते. डाळिंबाचे नियमित सेवन शरीरातील रक्ताची गुणवत्ता सुधारण्यास लाभदायी ठरते. शरीरात पुरेश्या प्रमाणात शुद्ध रक्त असल्यामुळे उत्साह संचारतो.
  • 2) रोगप्रतिकारक शक्ती वाढते – डाळिंबाचे नियमित सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मोलाची मदत करते. सध्या कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशा परिस्थितीत दररोज किमान एक डाळिंब खाणे लाभाचे ठरू शकते.
  • 3) पचनाच्या समस्या दूर होतात – नियमित डाळिंबाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक विकार दूर होतात. पचनाच्या समस्या सुटण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते.
  • 4) हृदयविकार असल्यास डाळिंब खाणे लाभाचे – हृदयविकार असल्यास दररोज किमान एक डाळिंब खावे. डाळिंबाचे नियमित सेवन शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते.
  • 5) डाळिंब खाण्याचे तब्येतीला होणारे अनेक फायदे – डाळिंब या फळातील पौष्टीक घटक रक्तदाब (ब्लडप्रेशर), हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह, उष्णतेचे विकार, सांध्यांचे विकार, वातविकार, त्वचाविकार, स्मृतीदोष, अशक्तपणा या समस्या दूर करण्यास मदत करतात. याच कारणामुळे दररोज किमान एक डाळिंब खावे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe