अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- महापालिकेच्या महापौर पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल रोहिणीताई शेंडगे यांचा सत्कार वीर लहुजी वस्ताद मातंग समाज संघटनेच्यावतीने सिद्धार्थ नगर येथे करण्यात आला यावेळी मातंग समाजाचे अंकुश मोहिते, पोपट पाथरे, राम गाडे, अश्विन सोनवणे,
महेंद्र भालेराव, निलेश ससाने, दीपक मोहिते, अनिल वाघमारे, आकाश मोहिते, विनोद शिंदे, लखन वाघमारे, आदेश लोढे आदी उपस्थित होते.
यावेळी अंकुश मोहिते म्हणाले की मातंग समाजाचे रोहिणीताई शेंडगे यांना महापालिकेच्या महापौर पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
व शेंडगे यांना महापौर पदी वर्णी लावल्याबद्दल नगर शहराचा विकास होणार व मातंग समाजाच्या अनेक प्रश्न सोडविणार असल्याची भावना व्यक्त केली व मातंग समाजाचा भव्य मेळावा घेऊन रोहिणीताई शेंडगे
व आ.संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची भावना अंकुश मोहिते यांनी व्यक्त केली व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मातंग समाजाच्या उमेदवारास महापौर पदी वर्णी लावल्याबद्दल त्यांचे देखील आभार समाजाच्या वतीने मानण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम