फरार आरोपीस मदत करणे वकिलाला पडले महागात!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- आतापर्यंत आपण अनेकदा मोठमोठ्या प्रकरणात वकिलाने प्रभावीपणे बाजू मांडून वस्तुस्थिती समोर आणली आहे. मात्र फरार असलेल्या आरोपीला मदत करणे एका वकिलाला चांगलेच भोवले आहे.

आरोपीस मदत केल्या प्रकरणी पोलिसांनी संबंधित वकिलासह त्याची पत्नी व मुलास अटक केली आहे. अ‍ॅड. सुनिल मोरे (रा.बिबवेवाडी) असे वकिलाचे नाव आहे.

फसवणूक करुन जमिनी बळकाविण्याबरोबरच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बर्‍हाटे टोळीवर १२ गुन्हे दाखल आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून बर्‍हाटे फरार आहे. त्याला मदत करणे तसेच त्याच्याशी संपर्क असल्याच्या आरोपावरुन गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी त्याची पत्नीस अटक केली होती.त्यानंतर मुलास अटक केली होती.

या दोघांकडे केलेल्या चौकशीत बर्‍हाटे याला मदत करण्यात अ‍ॅड. मोरे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने अ‍ॅड. सुनिल मोरे याला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News