रेखा जरे हत्याकांडातील त्या आरोपीचा जमीन फेटाळला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश ऊर्फ टम्या पवार (प्रवरानगर) याचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल केला अर्ज न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी फेटाळला. जरे खून प्रकरणातील ६ आरोपींपैकी कोठडीत असलेल्या टम्या पवारने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली.

पवारच्या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील व जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी विरोध केला. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. मुख्य सूत्रधार बाळ बोठे, टम्या पवार याच्यासह एकूण ६ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

यापैकी ५ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले. नंतर बोठेविरुद्धही पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले. या आरोपींपैकी टम्या पवार याने जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणीच्या वेळीसरकारी पक्ष

व फिर्यादीची बाजू मांडताना सरकारी वकील यादव पाटील व फिर्यादीचे वकील अ‍ॅड. पटेकर पटेकर यांनी,

आरोपी टम्या पवारने हत्याप्रकरणातील बोठे यांच्यासह इतर आरोपींशी २४ नोव्हेंबर २०२० रोजी किमान १७ वेळा मोबाईलवरून संपर्क साधला व पोलिस तपासात ही बाब निष्पन्न झाली असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe