शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी या दिवशी होणार जाहीर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत असल्याने नवीन विश्वस्तांची यादी 7 जुलैला न्यालयात सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली.

साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे मुदतवाढ दिली होती. त्यानंतर सोमवारी याबाबत सुनावणी होणार होती.

पण आता ती दोन दिवस लांबणीवर पडली आहे. या नव्या विश्वस्त मंडळाच्या यादीवर आक्षेप घेण्याची शक्यता गृहीत धरून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान साई संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त निवडीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू होती.

आता ही यादी 7 जुलैला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या विश्वस्तांच्या यादीकडे सर्वांच्या नजरा आहेत. जाणून घ्या काय असू शकते संभाव्य यादी शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ वाटपात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आले आहे.

या पदासाठी कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे यांचे नाव या संभाव्य यादीत आहे. उपाध्यक्ष शिवसेना या पदासाठी रवींद्र मिर्लेकर यांचे नाव चर्चेत आहे. या नावाच्या याद्या यापूर्वी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आहेत.

– काँग्रेस – डॉ. एकनाथ गोंदकर, डी. पी. सावंत, सचिन गुजर, राजेंद्र भोतमागे, नामदेव गुंजाळ, संग्राम देशमुख, सत्यजित तांबे, करण ससाणे. – शिवसेना- रवींद्र मिर्लेकर, राहुल कनाल, खा. सदाशिव लोखंडे, संगीता चव्हाण,

संजय दुसाने, रावसाहेब खेवरे (एक नाव प्रलंबित) याशिवाय तीनही पक्षाकडून काही नावे अचानक पुढे येण्याची शक्यता आहे. – राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य यादी- आशुतोष काळे, जयंत जाधव, अजित कदम, पांडुरंग अभंग, महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, अनुराधा आदिक, संग्राम कोते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe