शिर्डीत सुपारी देऊन केला त्या बांधकाम मजुराचा खून !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  चार लाखांची सुपारी घेऊन बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी अटक केली.

दहा वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला कंटाळून अमाेल सालाेमन लाेंढे (३२, रा. कलानगर, शिडी) याने ही सुपारी दिल्याचे पाेलिस तपासात स्पष्ट झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पाेलिसांनी संयुक्तपणे केली.

राजू उफ चंद्रहास सुभाष उबाळे (१९, रा. पाथर्डी गाव, सुखदेवनगर, नाशिक), अविनाश प्रल्हाद सावंत (१९, रा. पाथर्डी गाव, नाशिक) व अरविंद महादेव साेनवणे (१९, रा. श्रीरामनगर, शिडी) अशी आराेपींची नावे आहेत. बांधकाम मजूर संजय पवार व त्यांच्या मामाचा मुलगा राजेंद्र धिवर (दाेघे रा. राजगुरूनगर, शिर्डी) हे दाेघे २९ जूनला सायंकाळी काम संपवून साकलवर घरी जात हाेते.

थकल्यामुळे ते राहता- शिर्डी रस्त्याच्या कडेला माेकळ्या जागेत बसले. यावेळी दाेन जण माेटारसायकलवरून तेथे आले. त्यांनी धिवर यांच्याकडे माचिस मागितली. धिवर यांनी माचिस दिली. परंतु ती हातात न दिल्याचा राग आल्याने आराेपींनी धिवरच्या डाेक्यावर व पाेटावर शस्त्राने वार केले.या हल्ल्यात पवार यांनी स्वत: जीव वाचवला.

सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून पाेलिस आराेपींपर्यंत पाेहचले. आराेपी अमाेल लाेंढे याच्या सांगण्यावरून खून केला असल्याची कबुली आराेपींनी दिली. गुन्ह्यातील इतर आराेपी हसीम खान, कुलदीप पंडीत, गॅस उर्फ साहिल शेख व साहिल पठाण हे फरार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe