अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झाले नाही, असे मत रजनीकांत यांनी ट्विटरवरून पोस्ट केलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.
रजनीकांत हे गेल्या आठवड्यात अमेरिकेहून परतले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सदस्यांशी चेन्नईत सोमवारी सकाळी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पक्ष विसर्जित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम