अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- सिने अभिनेत्री करीना कपूर व लेखिका आदिती शहा यांनी प्रकाशित केलेल्या करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल
या पुस्तकात वापरण्यात आलेला बायबल शब्द त्वरित हटवा, अशी मागणी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पाठवलेल्या निवेदनात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.
भोसले म्हणाले, करिना कपूरच्या पुस्तकाच्या शीर्षकात वापरण्यात आलेल्या बायबल शब्दामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, जिल्हा महिला अध्यक्ष जयमाला पवार,
अविनाश काळे, शहराध्यक्ष अमोल लोंढे, सुनील वाघमारे, प्रभाकर जगताप, शशी पगारे, फॅड्री फर्नांडिस, प्रभाकर जगताप, मार्कस बोरडे आदींनी निवेदनाद्वारे केली. या मागणीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम