लग्न करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  ज्यांचं लग्न या लॉकडाऊनमध्ये नियोजित होतं, त्यांना नाईलाज म्हणून लग्न स्थगित करावं लागलं. पण त्यानंतर चांगला मुहूर्त नसल्याने काही जणांची लग्न अजून झालेली नाहीत.

अशा समस्त लग्नाळू मंडळींसाठी गूड न्यूज आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे मुहूर्त असल्याचं पंचागकर्तै सांगतायेत. शास्त्रानं सुद्दा या मुहूरर्तांना योग्य सांगितलं आहे, त्यामुळं रखडलेल्या लग्नांचा आता खुशाल बार उडवून दोनाचे चार हात करण्याची संधी आहे.

यंदा आषाढ श्रावण , भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. पंचांगात याला आपात्कालीन मुहूर्त म्हणतात.

असे आहेत मुहूर्त –

  • आषाढ 7 मुहूर्त
  • श्रावण 11 मुहूर्त
  • भाद्रपद 3 मुहूर्त
  • आश्विन 6 मुहूर्त

अडचणीच्या प्रसंगी काढलेले हे मुहूर्त आहेत. सगळे पंचांगकर्ते 2019 मध्ये एकत्र आले आणि त्यांनी असे मुहूर्त काढण्याच्या निर्णय घेतला.

या असल्या मुहूर्तांनी आता लग्न मंगल कार्यालय चालकही खुश आहेत. या महिन्यांतही लग्न झालं तर व्यवसाय सावरायलाही मदत होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेा चालणा ही मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!