काय सांगता ! कर्करोगावर गुणकारी आहे कांद्याचे बी ; वाचा सविस्तर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कांदा हा पांढरा व लाल स्वरूपात येतो. दोन्ही औषधी आहेत. तिखट, तिक्ष्ण, थंड, वातशमन करणारा, भूक वाढविणारा असा हा कांदा पौष्टिकही असतो. कांदा खाल्ल्याने शरीर सर्व रोगांपासून दूर राहते.

कांद्याबरोबरच कांद्याचे बी देखील गुणकारी आहे. याला कलोन्जी असेही म्हणतात. आयुर्वेदामध्ये या बियांना अनन्यसाधारण महत्व आहे. यात कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशीयम, आणि फायबर हे तत्वे मुबलक मात्रेमध्ये असतात.

कांद्याच्या बियांचा वापर फार पुरातन काळापासून आपल्याकडे केला जात आहे. या बियांमध्ये अनेक औषधी गुण असल्याने आयुर्वेदामध्ये देखील या बियांना महत्वाचे स्थान दिले गेले आहे. अनेक ठिकाणी कलोन्जीला काळे जिरे म्हटले जाते. जाणून घेऊयात याचे फायदे –

कर्करोगाशी लढण्याची क्षमता  – कर्करोगाशी लढण्याची क्षमता असणारे अँटी ऑक्सिडंट्स कलोन्जीमध्ये मुबलक मात्रेमध्ये असतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कलोन्जीचे सेवन केले जाणे गरजेचे आहे. ह्यासाठी एक चमचा कलोन्जीचे तेल एक ग्लास द्राक्षाच्या रसामधून घेतल्याने शरीराला पोषण मिळते. ज्यांना किडनी स्टोन असेल, त्यांनी त्यांनी कलोन्जीच्या बिया वाटून मधासोबत घ्याव्या. त्याने स्टोन निघून जाण्यास मदत होईल.

मधुमेहात अराम: ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कलोन्जीचे सेवन केल्याने रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहते.

सांधेदुखी: कलोन्जीच्या तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून त्याचा चांगला काढ काढावा, आणि थंड झाल्यावर या तेलाने सांध्यांची मालिश करावी. तसेच मालिश केल्यानंतर त्या ठिकाणी कापडाची पट्टी बांधून ठेवावी. काही दिवस दररोज हा उपाय केल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

मुतखडा: ज्यांना किडनी स्टोन असेल, त्यांनी त्यांनी कलोन्जीच्या बिया वाटून मधासोबत घ्याव्या. त्याने खडा पडून जाण्यास मदत होते.

डोकेदुखी: कधी कधी मानसिक तणाव आल्याने डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. डोकेदुखीपासून आराम मिळविण्याकरिता कलोन्जीच्या तेलाने मालिश करावी.

निद्रानाश : कधी कधी रात्रीची झोप अपुरी झाल्याने किंवा थकवा आल्याने, मानसिक तणाव आल्याने डोकेदुखीचा त्रास सुरु होतो. डोकेदुखीपासून आराम मिळविण्याकरिता कलोन्जीच्या तेलाने मालिश करावी. या तेलाने मालिश केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe