महिला आणि नारळ यांचा काय आहे परस्पर संबंध ; जाणून घ्या सर्व रोचक माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी श्रीगणेशाची पूजा केली जाते. भगवान गणेशाची पूजा केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. यामागे मोठे कारण आहे. तसेच पूजा करताना नारळाला मोठे महत्त्व आहे.

पूजा करताना नारळ असणे गरजेचे असते. नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतत की नारळ चढवल्याने पैशांची समस्या व धन संपत्ती बद्दल समस्या दूर होतात. पुजेनंतर हेच नारळ फोडून सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो.

मात्र, हे नारळ स्त्री कधीच फोळत नाही. मात्र, स्त्री नारळ का फोडत नाही, हे अनेकांना माहिती नाही.

हे आहे कारण – पूजेच्या वेळी हिंदू धर्मात नारळ हे एक महत्त्वाचे फळ आहे. कोणतीही वैदिक किंवा दैवी पूजा प्रणाली नारळ फोडल्याशिवाय अपूर्ण मानल्या जातात. परंतु स्त्रिया नारळ फोडत नाहीत हीदेखील एक सत्यता आहे.

नारळ हे बीज प्रकार आहे, म्हणूनच ते उत्पादनाचे घटक मानले जाते. नारळास प्रजनन क्षमताशी जोडले गेले आहे. स्त्रिया बिजापासूनच बाळाला जन्म देतात आणि म्हणूनच महिलेने बीजरूपी नारळ फोडणे अशुभ मानले जाते.

नारळाला मानतात मानवाच प्रतिरूप –  शास्त्रानुसार स्त्रियांनी नारळ फोडणे हे अशुभ मानले जाते. यामागे एक कथा ही अशी प्रचलित आहे की, जे ब्रह्मऋषी विश्‍वमित्र होते त्यांनी या विश्‍वाची निर्मिती केली.

मात्र, हे विश्‍व निर्माण करण्यापूर्वीच ब्रह्मऋषी विश्‍वमित्र यांनी नारळाची निर्मिती केली होती. म्हणूनच या नारळाला मानवाचे प्रतिरूप मानले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe