नैसर्गक आपत्ती मुळे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविली जात आहे.

योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखिमेच्या बाबी अंतर्गत गारपीट, भुस्स्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी, वीज कोसल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंस ॲप,

संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक (1800 1032 292), बँक, कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळविताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक असेल.

याबाबत अधिक तपशिलासाठी तात्काळ नजीकच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर यांनी कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!