अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. दरम्यान माजी रमेश लाढाणे यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. मनीषा लांडे, संग्राम घोडके, ज्योती खेडकर व दीपाली औटी यांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर होती.
या चारही जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात मनीषा लांडे यांचे नाव निघाले. त्यानंतर भाजपकडून मनीषा लांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेस आघाडीकडून संतोष पोपटराव कोथिंबिरे यांनी अर्ज दाखल केला, मात्र अपुऱ्या संख्याबळाचा विचार करता कोंथिबिरे यांनी माघार घेतल्याने लांडे यांची बिनविरोध निवड झाली.
प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. लांडे यांचे निवडीबद्दल आमदार बबनराव पाचपुते, मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, भाजपच्या गटनेत्या छायाताई गोरे, मावळते उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी कौतुक केले.
दरम्यान नव्याने निवडून आलेल्या सर्वांना संधी देण्याची भूमिका आ. बबनराव पाचपुते यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. पाच नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या पंचवार्षिकमधील राहिलेल्या महिन्यांचे समान वाटप करत सर्वांना दहा दहा महिने संधी देण्यात येत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम