माजी नगराध्यक्ष नगरसेवकाला म्हणाला ‘तू तर वाळूचोर आहे’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- श्रीरामपूर पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान पालिका निवडणूक तोंडावर आल्याने नगरपालिकेतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याचीच काहीसा अनुभव श्रीरामपूरकरांना गुरुवारी अनुभवयास मिळाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, काँग्रेसच्यावतीने आशा सेविकांच्या मानधनप्रश्नी मुख्याधिकार्‍यांना घेराव घालण्यात येणार होता. त्यासाठी माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे हे नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या सहकार्‍यांची वाट पहात होते. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवक रवी पाटील हे पालिकेतून आपले काम आटोपून बाहेर आले. दोघांची नजरानजर झाली.

त्यावेळी नगरसेवक रवी पाटील यांनी काय पाहतोस? असे डिवचले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. नगरसेवक रवी पाटील यांना उद्देशून ‘तू तर वाळूचोर आहे’, असे माजी नगराध्यक्ष कांबळे म्हणाले. त्याला नगरसेवक रवी पाटील यांनी तू पिपल्स बँक खाल्ली?

असा प्रतिहल्ला केला. ही बाचाबाची पहाण्यासाठी नगरपालिकेसमोर नागरिकांनी एकच गर्दी केली. काहींनी आवरण्याचा प्रयत्नही केला. मात्र दोघांनीही एकमेकांवर तोंडसुख घेतले. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे व नगरसेविका भारती कांबळे यांनी नगरसेवक रवी पाटील यांच्या विरोधात विरुध्द तक्रार दाखल केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक रवी रमेश पाटील यांचेविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याप्रकरणी नगरसेवक रवी पाटील यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी अनिल शामराव कांबळे यांचेविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe