नवीन दुचाकी वाहनांचे पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरु करण्यात येत आहे.

इच्छुक अर्जदारांनी सकाळी १० ते दुपारी २.३० वाजे पर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक १९ येथे डिमांड ड्राफ्ट जमा करावेत.

वाहन ज्यांच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड जोडावा. पसंती क्रमांक शुल्काचा डिमांड ड्राफ्ट असल्यास सदर डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प ब्रँच/ ट्रेझरी ब्रँच,

कोड नं. १३२९६ करीता देय असावा. एकच क्रमांकासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्ज आले तर त्या पसंती क्रमांकाची यादी ७ सप्टेंबर रोजी चांदणी चौकातील नवीन इमारतीत प्रवेशव्दाराजवळ प्रदर्शित करण्यात येईल.ज्याने जास्त रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe