अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- येथील रेल्वे मालधक्या वरील हुंडेकरी व वाहतूक संघटनेच्या आडमुठेपणामुळे बंद झालेले काम चालू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रेल्वे माथाडी कामगार युनियनच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अहमदनगर रेल्वे वरील लोडींग अनलोडींगचे काम हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी माल येथे न बोलावल्यामुळे बंद आहे. या रेल्वे मालधक्क्यावर माथाडी मंडळातील सुमारे ६०० नोंदणीकृत कामगार काम करत आहेत. हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांच्यामध्ये दर ३ वर्षासाठी करार होत असतो. पण गेल्या वर्षीच्या कोरोणामुळे केवळ १ वर्षाचेच करार करण्यात आला होता.
मार्चमध्ये हा करार संपुष्टात आल्यानंतर कामगार आणि हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार संघटना यांच्यामध्ये वेळोवेळी बैठका झाल्या, त्यामध्येही उपरोक्त प्रश्न सुटला नाही म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष आणि कामगार मंडळ अहमदनगर यांनी इतर जिल्ह्यातील रेल्वे मालधक्का वरील प्रचलित दराचा सांगोपांग विचार करून कामकाज सुरळीत होण्यासाठी मजुरी व वाराईचे दर निश्चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले.
माथाडी कामगारांनी प्रस्तुत आदेश मान्य असल्याचे आणि काम करण्यास तयार असल्याचे लेखी स्वरूपात कळवले आहे. पण हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल जाणीवपूर्वक इतरत्र स्थलांतरीत केला.
या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष माथाडी कामगार मंडळ अहमदनगर यांनी वारंवार आदेश देऊनही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. माथाडी कामगार काम करायला तयार असतानाही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आदेश असतानाही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार आडमुठेपणाची धोरण घेत असून,
अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर माल आणायच्या ऐवजी इतरत्र उतरवला जात आहे. आपत्ती काळात माथाडी कामगारांची उपासमार करण्यासाठी तो माल उतरविण्यात येत आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम