विकासासाठी विखे पाटील परिवाराचे योगदान पुर्वीपासूनच राहीले,परंतू काहींना त्‍याचा विसर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शिर्डी मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या गावांच्‍या विकासासाठी विखे पाटील परिवाराचे योगदान पुर्वीपासूनच राहीले. परंतू काहींना त्‍याचा विसर पडतो, या गावांच्‍या विकासासाठी विखे पाटील परिवार कटीबध्दच राहील अशी ग्‍वाही जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी दिली.

तालुक्‍यातील पिंप्री लौकी अजमपूर येथे ५२ लाख रुपये खर्चाच्‍या विकास कामांचा शुभारंभ सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. याप्रसंगी जिल्‍हा परिषद सदस्‍या अॅड.रोहीणी निघुते, पंचायत समि‍ती सदस्‍य निवृत्‍ती सांगळे, प्रवरा बॅंकेचे चेअरमन अशोकराव म्‍हसे, विखे पाटील कारखान्‍याचे संचालक डॉ.दिनकर गायकवाड, आर.डी कदम, साहेबराव लव्‍हाटे, भारत गिते, सरपंच नंदाताई गिते, उपसरपंच विकास दातीर,

अशोक ज-हाड, सविता गिते यांच्‍यासह पदाधिकारी ग्रामस्‍थ उपस्थित होते. संगमनेर तालुक्‍यात असलेल्‍या या गावांचा ऋणानूबंध विखे पाटील परिवाराशी तीन पिढ्यांपासूनचा आहे. या गावांच्‍या विकासासाठी कधीही राजकीय अभिनिवेश आड येवू दिला नाही. पूर्वी ही गावे संगमनेर मतदार संघात होती तरी, या भागाच्‍या प्रश्‍नांसाठी सहकार्याचीच भूमिका घेतली.

आता ही गावे शिर्डी मतदार संघात समाविष्‍ठ झाल्‍यापासून या गावांच्‍या विकासाला आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन दिला. या गावांच्‍या विकासासाठी कटीबध्‍द राहण्‍याची ग्वाही त्‍यांनी यावेळी दिली. मागील दोन वर्षे कोव्‍हीडच्‍या मोठ्या संकटाला आपल्‍या सर्वांना सामोरे जावे लागले.

या कठीण काळातही जनतेसाठी कोव्‍हीड सेंटर निर्माण करुन, मोफत उपचारांची सुविधा निर्माण करुन देण्‍यात आल्‍याने याचा मोठा दिलासा सर्वांना मिळाला. कोव्‍हीडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता लक्षात घेवून, अधिक काळजी घेण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe