अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची सरपंच परिषदेच्या नगर तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक नंदकुमार औटी यांनी त्यांचा सत्कार केला.
पै. डोंगरे यांनी पारनेर येथे निलेश लंके प्रतिष्ठान युवक संपर्क कार्यालयास भेट दिली असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे युवक तालुकाध्यक्ष विजय औटी, मराठा महासंघाचे जिल्हा सदस्य राजेंद्र म्हस्के, रघुनाथ डोंगरे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के, रविंद्र गंधाडे आदी उपस्थित होते.
नगरसेवक नंदकुमार औटी म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात पै. नाना डोंगरे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची विविध संघटना व परिषदेवर नियुक्ती झालेली आहे.
डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील सामाजिक योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन योगदान देत असून, निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम