अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्या रस्त्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले.
कुष्ठधाम येथे रस्ता नामकरण फलकाचे अनावरण बसपाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमोद रैना व प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांच्या हस्ते झाले. बहुजन समाज पार्टीच्या संवाद यात्रेनिमित्त नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले रैना व ताजने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर रस्त्याचे नामकरण करण्यात आले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, विधानसभा अध्यक्ष प्रतिक जाधव, राजू भिंगारदिवे, दीपक पवार, नंदू भिंगारदिवे, वैभव जाधव, प्रशांत भिंगारदिवे,
मयूर भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, भाऊसाहेब भिंगारदिवे, शहेबाज शेख, अॅड. दर्शन भिंगारदिवे, सिद्धार्थ पाटोळे, अनिल भिंगारदिवे, प्रशांत जाधव, फईम खान, विकी नारंग, प्रशांत भिंगारदिवे, राहुल बरबडे आदिंसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी महापुरुषांच्या नावाने असलेल्या वास्तू व रस्ते त्यांच्या विचारांची प्रेरणा देत असतात. महामानवाचे रस्त्याला नांव देऊन बसपाने स्थानिक नागरिकांच्या मनातील मागणी पुर्ण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांनी या रस्त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देणे ही भुषणावह बाब असून, सर्व समाजाला अभिमानस्पद गोष्ट आहे. महापालिकेने देखील ठराव घेऊन या रस्त्याचे अधिकृत नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग जाहीर करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मौजे सावेडी येथील टीपी स्किम 4 मधील फायनल प्लॉट नंबर 121 व 122 मधील जमीन महार वतनाची इनामी आहे. सदर प्लॉटमधून जाणार रस्ता हा समाज मालकीची वारसा हक्काची जमीन शासनाने वर्ग केलेली आहेत.
त्याबाबत मौजे सावेडी येथील टीपी स्किम 4 मधील कुष्ठधाम रोडवरून जाणारा सावेडी पूर्व जुना भिस्तबाग रोड ते रासनेनगर ते सावेडी गावठाणास जोडणार्या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे नांव देण्याची मागणी बसपाचे जिल्हाध्यक्ष राजू शिंदे व शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांच्या वतीने करण्यात आली होती.
या रस्त्याच्या नामकरणासाठी बसपाने पुढाकार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव दिले आहे. तसेच महापालिकेकडे देखील या रस्त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम