वीजचोरांवर महावितरणचा बडगा; नेवाश्यात 15 वीजचोरांवर कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहरात सप्टेंबर महिन्यात वीजचोरी करणाऱ्या १५ ठिकाणी कारवाई करीत १३ हजार ५६८ युनिटचा तब्बल २ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड आकारणी केली.

तसेच ५९ हजार रुपयांची तडजोड आकारणीही करण्यात आली. महावितरणच्या कारवाईमुळे शहरात वीज चोरांचे धाबे दणाणले असून,

दरम्यान शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत वीज ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीजचोरी शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत या कारवाया केल्या जात आहे. दरम्यान महावितरणच्या या मोहिमेने वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमुळे नेवासा शहरातील अधिकृत व नियमित वीज बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वीजचोरी शोधमोहिमेसाठी ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe