कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार मिळणार कि नाही? प्रशासनच अनभिज्ञ

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  देशात कोरोनाने कहर केला असून आजही कोरोनाचा कहर कायम आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने देशात आजवर लाखोंचे बळी घेतले आहे.

अनेक कुटुंबीय उध्वस्त झाले आहे. यातच केंद्राने जाहीर केले कि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये मिळणार आहे. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.

ही मदत राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची आस लागली आहे.

तथापि, याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

त्यामुळे ही मदत कधी मिळणार, हे अजूनही अनिश्चितच आहे. कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित झाले असले, तरी याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय आलेला नाही.

त्यामुळे या मदतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे. संबंधित कुटुंबीयांकडून ही मदत कधी, कशी प्राप्त होणार याबाबत विचारणा केली जात आहे.

यासाठीचे निकष काय यासंदर्भातही विचारणा होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडेच अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe