अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. करमाळा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले होते.
भोसले यास ता. 19 सप्टेंबर रोजी करमाळा पोलीसांनी अटक केली होती.गेली मनोहर भोसले दहा दिवसांपासून करमाळा पोलिस ठाण्यात अटकेत आहे. शुक्रवारी ता.1 रोजी करमाळा पोलिसांनी तपासासाठी सात दिवसाची वाढीव पोलिस कोठडी मागितली होती.
बारामती येथील न्यायालयातून न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी भोसलेला ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. दरम्यान मनोहर भोसले आजारी पडल्याने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आधी एक दिवसाची कोठडी देण्यात आली त्यानंतर त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय.
नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या बारामतीतील शशिकांत खरात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.
विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली.
पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा मनोहर मामावर आरोप आहे. याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम