अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील आघाडी सरकार सामान्य माणसाच्या हिताचा कोणताही निर्णय न करता सतेवर धिम्मपणे बसून आहे.
सर्वकाही केंद्राने करावे हीच जर त्यांची अपेक्षा असेल तर सतेवर राहाता कशालाॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय देशातील नागरीकांना समर्पित झाला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र सरकारने देशातील साठ वर्षापुढील जेष्ठ नागरीकांसाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जेष्ठ नागरीकांना सहाय्यक साधनाचे मोफत वितरण केले जाणार आहे.
एकूण २६ साधनांचा यामध्ये समावेश असून हव्या असलेल्या साधनांसाठी नागरीकांचे तपासणी शिबीर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने जनसेवा फौंडेशन आणि अहमदनगर जिल्हा दिव्यांग विभागातर्फे श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन राधाकष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती नानासाहेब पवार,
दिपक पटारे नानासाहेब शिंदे, शरद नवले, प्रकाश चिते, केतन खोरे, भाऊसाहेब बांद्रे, कल्याणी कानडे, सुनिल साठे, गिरीधर आसने, अॅड. दिपक बाराहाते उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम