कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार 50 हजार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- जिल्‍हयातील नागरिकांना कळविणेत येते की, राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाव्‍दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्‍हीड 19 ने मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वारसांना रक्‍कम रु. 50,000/- सानुग्रह मदत देण्‍याचे राज्‍यांना सूचित केलेले आहे.

तसेच मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचेव्‍दारे सानुग्रह मदत वितरणाबाबचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्‍तर तपशिल सूचित करण्‍यात येईल असे कळविले आहे.

अहमदनगर जिल्‍हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वारसांना रक्‍कम रु. 50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्‍ता खालीलप्रमाणे प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.

जाणून घ्या पत्ता व संपर्क क्रमांक

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, अहमदनगर

पत्‍ता – आपत्‍ती व्‍यवस्‍थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर

संपर्क क्र. – 0241 – 2323844, 2356940, (टोल फ्री क्रं.1077)

ईमेल – [email protected]

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे पदसिध्‍द अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी अहमदनगर हे आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचेव्‍दारे अर्ज सादर करण्‍याबाबतची ऑनलाईन कार्यपध्‍दती (अर्ज करण्‍याचे ठिकाण, विहित नमुना इ.) लवकरच अधिसूचित करण्‍यात येईल. त्‍याबाबतच्‍या सूचना प्राप्‍त होताच स्‍वतंत्रपणे कळविणेत येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe