शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत 4 एकर ऊस जळून खाक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाला लागलेल्या आगीत चार एकर ऊस जळून गेल्याची घटना नेवासा तालुक्यातील भालगाव येथे घडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आधीच अतिवृष्टी, कोरोना संकटांमुळे हवालदिल झालेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत माहिती अशी की, भालगाव येथून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर तनपुरे वस्तीजवळ प्रशांंत तनपूरे यांची जमीन आहे.

शेतात ऊसाचे पीक आहे. या शेतजमीनीत विद्युत खांब आहे. अचानक दुपारच्या सुमारास विद्युत पूरवठा सूरू असताना अचानक शाँर्टसर्कीट होऊन ऊसाला आग लागली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्याकरीता घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच नागरीकांनी अथक प्रयत्न करून आग विझवली. परंतु तोपर्यंत जवळपास चार एकर ऊस जळून खाक झाला होता.

घटनेची माहिती मिळताच विज पुरवठा खंङीत करण्यात आला. संबंधीत कार्यालयाने सदरील जळीत ऊसाचा पंचनामा करून जळालेल्या ऊसाची नूकसान भरपाई मिळावी

अशी मागणी शेतकरी प्रशांत तनपुरे यांनी केली आहे. दरम्यान अनेकदा महावितरणच्या निष्काळजीपणाचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe