अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य माहीत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले ही इतिहासाची साक्ष आहे.
या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ‘फोर्ट सेव्ह’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करू.
शासन गडकिल्ल्यांच्या बाबतीत उदासीन आहे.त्यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
विश्रामगड (ता.अकोले) येथे आयोजित 342 व्या शिवपदस्पर्श दिन कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विश्रामगड चढून जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विधिवत पूजा केली.
याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार राजाभाऊ वाजे, यशवंत आभाळे, उदय सांगळे, राजेंद्र डावरे, कैलास जाधव, नामदेव शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींचे आदर्श विचार आजही प्रेरणा देणारे आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी गड किल्ल्यांची निर्मिती म्हणजे अभूतपूर्ण गोष्ट आहे.
दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करणे शिवभक्तांची जबाबदारी आहे, असे मत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रयत्नामुळे विश्रामगडवर शिवसृष्टी साकारली आहे तसेच विश्रामगडाच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे शिवप्रेमी व पर्यटकांची याठिकाणी दिसून येते.
गडकिल्ले चढणे उतरणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. आमदार आणि खासदारांनी फक्त एकदा रायगड चढावा विना रोप वे मग काय आहे गड किल्ले तेव्हा कळेल. अशा शब्दात खासदार भोसलेंनी सरकारवर टीका केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम